Showing posts with label कविताविश्व. Show all posts
Showing posts with label कविताविश्व. Show all posts

अनवाणी पावलांनी(मराठी कविता)

| |

अनवाणी पावलांनी एकदा
टाकावचं ऎखांद पाऊल
कळायला हवी कधीतरी
काट्याकुपाट्यांची चाहुल
अनवाणी पावलांनी कधी
निखार्यावरही चालुन पहावं
हे ही नाही पटलं तर
स्वैर पाण्याबरोबर वहावं
अनवाणी पावलांनी मग
जिंकावी आकाश नी धरती
मरणालाही जिंकून मग
खुशाल जावं वरती....!!

-गणेश शिंदे..
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

सहजचं..

| |

आपल्याला ते आवडावेतं
ज्यांना आपण आवडतो...
नाहीतर निरर्थक गोष्टींसाठी,
आपण व्यर्थ आयुष्य दवडतो.
भावनांच्या भरात ऊगाच
हातंच सोडायला बघतो
अन पळणांर निसटून गेलं की,
परत हातंच्या मागं निघतो...
आयुष्य नेहमींच सुंदर होतं...सुंदर आहे..
थोडंस अॅडजस्ट केलं ना.. की,
खुशियो का समंदर आहे!!!

-गणेश शिंदे, दुसरबिडकर©®
9975767537

सल..(मराठी कविता)

| |

नाही पुनवेचा चांदवा..निदान..
सुखाच्या चांदणीनं तरी...
आयुष्याजवळ सरकावं....
नाही सुर्याचा लख्ख प्रकाश..निदान..
एखाद्या काजव्यानं तरी..
जरासं जवळून फिरकावं....!!
संदर्भ बदलत जावे..पण..
आशय नेमका तोच रहावा..
कायदे अन वायदे..बदलावेत..आयुष्याचे..
पण..निश्चय नेमका तोच रहावा..!!

-गणेश शिंदे
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

पुन्हा एकवार..(कविता)

| |

पुन्हा एकवार...
*********
पुन्हा एकवार.....
मेंदीभरले हात हातात आले
अर्धोन्मिलीत नयनांचे देणेघेणे झाले
निळ्या आभाळाला फिरुन एकवार
धरतीचे अनामिक देने मिळाले
************
पुन्हा एकवार....
पैंजणांचा नाद स्थिरावला
श्वासभरला देह थरथरला
अधोरेखित स्वप्नात पुन्हा
हवाहवासा गुलाबी रंग भरला
**************
पुन्हा एकवार.....
आयुष्यातला चंद्र सजला
अंगातला विरहाचा दाह विझला
मोकळ्या आभाळातला पाऊसही
स्वतच्या थेंबात पुन्हा भिजला
************
पुन्हा एकवार.....
'तू' अलगद आयुष्यात आली
हिरवी गाणी पुन्हा फुलली
तुझी साथ झाली..म्हणुनचं
रातरानी पुन्हा बहरली
**************
पुन्हा एकवार.....
मी माझा राहिलो नाही
हरलो नाही..हरवलो नाही
तू सोबत आहे,म्हणुनचं
चालत राहीलो,थांबलो नाही.
***************
-गणेश शिन्दे®
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

शस्त्रसंधीचा कशाला??(गजल)

| |

पाहुनी जालिम विषारी माणसाची जात साली..
दंश करणे सोडुनी तो नागही करतो दलाली...!!

शस्त्रसंधीचा कशाला तू उगा धरतेस हेका..
जीवघेणे तीर आधी टाक डोळ्यातून खाली..!!

यार श्वासांची उधारी वाढली भरपूर आता..
अन किराणा जीवनाचा संपण्या सुरुवात झाली..!!

दाखले प्रेमातले मागू नको मजला सखे तू..
कागदे चुरगाळण्याचा नाद मज आहे मवाली..!!

केवढा होतो सुखाचा पाहुण्यासम सोहळा तो..
मग दुखाच्या का शिरावर वांझ असण्याची हमाली?? 

ह्याच गावावर किती रुसला कसा हा पावसाळा.. 
अन हवेने आणली नाही कधी साधी खुशाली..!!

सोडले रागावणे तेव्हा तुझ्यावर जीवना मी..
यार अगतिकता तुझी मृत्यूपुढे जेव्हा कळाली..!!

-गणेश उत्तमराव शिंदे...
दुसरबिड,बुलडाणा..
९९७५७६७५३७

तुझी एक चाहुल

| |

तुझी एक चाहुल
शांत माझा श्वास
तुझा एक कटाक्ष
जीव माझा खल्लास
तुझं नुसतं दिसणं
माझं काळीज हसणं
तुझा ओझरंता स्पर्श
माझं शुन्यात असणं
तुझ्या कपाळीची बटं
जीव माझा खालीवर
तुझं ओठांवर बोट
श्वास माझा वरवर
तुझं ओळखींच स्मीत
मनी फुलवते प्रीत
तुझ्या माझ्यामध्ये पण
असे अबोल्याची भींत
तुझं असं येणं जानं
मने जपे क्षणोक्षण
काय खोटं आणी खरं
सखे आता तुच जानं
तुझी पैंजणाची चाल
माझं थांबत पाऊल
सखे माझं असं होतं
तुझी लागता चाहुल!!
-निशिगंध (गणेश शिंदे, दुसरबिडकर)©®