Showing posts with label काव्यफुले. Show all posts
Showing posts with label काव्यफुले. Show all posts

जिंदगी...

| |

ईन्कार केला नाही ,ईकरार केला नाही..
ज्या थाळीने दिले ,तीला सुराख केला नाही.
अबोल बंदिशीचे जीणे ,आजवर झाले गाणे..
दिला शब्द फिरवला ,प्रकार असला झाला नाही.
काळजावर झाले घाव ,त्यांच्या तुकड्यांचा झाला भाव..
सोसल्या यातनांचा गाव ,जीभेवर वसला नाही..
मन स्वछंद रानात फिरले ,फिरतांना उनाड ठरले.
जिंकता जिंकता हरले, पण तकरारीला हात दावला नाही.....!!!
-निशिगंध (गणेश शिंदे,दसरबिडकर)®

एक मैफल..विटलेली....

| |

दुरावले माझे गाणे
दुरावले माझे सूर
मैफिलीला रंग नाही 
ती विराणी दूरदूर. ..!! 

काळजाच्या नक्षत्रांना 
काजळी कशी हि आली?
आठवांच्या अवर्षणी
पापणी अशी का ओली?  

चंन्द्र आता ग्रासलेला
माझ्या कसा अंतरंगी....?.
इन्द्रधनू बेरंग नी
बघ दाह होतो अंगी...! ! 

ओळखीचा शब्द शब्द
मला ओळखेना झाला ..
एकेक करुन सारा..
हा संसार दुर गेला. ..!! 

ओठ माझे स्तंभलेले
शब्द माझे थांबलेले
उसळते रक्त माझे
ते ही आता सांडलेले..!! 

आता फक्त भारवाही
देह वाहतो पसारा ... 
अनोळखी संसार नी
फक्त ओळखीचा वारा...!! 

गोठलेल्या लोचनांनी
मिटलेल्या पापण्यांनी ..
साथ मज दिली फक्त,
आभाळाच्या पाखरांनी. ..!! 

मग..एकदा असेच...
आयुष्यमौन सरेल ..
देहाची राख विरेल..
न सुटणारे ते कोडे.. 
मग सहज सुटेल..!!!  

-निशिगंध (गणेश शिंदे,दुसरबिडकर)®

...निर्मिका.. (कविता)

| |

निर्मिका तुझा सोहळा आम्हास उमजला नाही.
शर्थ केली कैकदा, पण खेळ समजला नाही..!!   

तू हाडामांसाचा बनुनी कधी कुणास भेटला का रे??
कि पाषाण म्हणुनी नुसते,आयुष्य कंठला सारे?  

म्हणे निर्मिलास तू अवघा, ह्या विश्वाचा पसारा.
मग लाखमोलाची दौलत सोडुन,केलास कुठे पोबारा??  

तू मंदिरात असतो का? कि उनाड हिंडत बसतो??
तुझ्या असल्या वर्तणुकीला, जो तो हसतो अन रुसतो ..!! 

तुझ्या नावावरती  कैकांनी, सजवला व्यापार सारा .
अन पाषाणा तुझ्या नशिबी, फक्त हारांचा भारा..!! 

तू जागा असशील तर मग, हा विध्वंस असा का होतो?
जो तो येता जाता का, तुझे अधिकार हाती घेतो??  

बघ मग..असशिल तर दीस..नसशिल तर दगडातचं बस..
पण तुझ्या वाटेंकडे डोळे असणार्यांसाठी, एकदा तरी हसं.......!!!
-निशिगंध (गणेश शिंदे,दुसरबिडकर)®