...निर्मिका.. (कविता)

| |

निर्मिका तुझा सोहळा आम्हास उमजला नाही.
शर्थ केली कैकदा, पण खेळ समजला नाही..!!   

तू हाडामांसाचा बनुनी कधी कुणास भेटला का रे??
कि पाषाण म्हणुनी नुसते,आयुष्य कंठला सारे?  

म्हणे निर्मिलास तू अवघा, ह्या विश्वाचा पसारा.
मग लाखमोलाची दौलत सोडुन,केलास कुठे पोबारा??  

तू मंदिरात असतो का? कि उनाड हिंडत बसतो??
तुझ्या असल्या वर्तणुकीला, जो तो हसतो अन रुसतो ..!! 

तुझ्या नावावरती  कैकांनी, सजवला व्यापार सारा .
अन पाषाणा तुझ्या नशिबी, फक्त हारांचा भारा..!! 

तू जागा असशील तर मग, हा विध्वंस असा का होतो?
जो तो येता जाता का, तुझे अधिकार हाती घेतो??  

बघ मग..असशिल तर दीस..नसशिल तर दगडातचं बस..
पण तुझ्या वाटेंकडे डोळे असणार्यांसाठी, एकदा तरी हसं.......!!!
-निशिगंध (गणेश शिंदे,दुसरबिडकर)®

...याद आहे....

| |

तुझ्या नयनांवरचा इन्द्रधनु याद आहे.
तुझ्या पैंजनांचा रुणुझुनू नाद याद आहे. ! 

कैक श्रावण आले..आले अन गेले.
तुझ्या गालावरचे थेंब ओले, याद आहे. ! 

तुझं चांदण्यांच हसणं,अन हलकेच रुसणं,
तुझं असणं अन नसणं,अजुन याद आहे. ! 

तुझे मंद धुंद श्वास, अन श्वासांचे भास,
माझ्या आठवांत खास,अजुन याद आहे. ! 

तुझं पाठमोरं वळणं ,अन काळीज जळणं,
खार्या पाण्याने गालांना छळणं..अजुन याद आहे!!  

-निशिगंध (गणेश शिंदे,दुसरबिडकर)