सखे...

| |

सखे.... 
तू ऎकदा म्हण,`तू मला खरंच नकोस,
तुझ्यामाझ्यातंल अंतर हजारो कोस`
मग मी म्हणेन..लाखो कोसावर चंन्द्र
अमावस्येला, त्याच्यावर का नसतो रोष?
सखे.... 
तू म्हण, आता तुझ्यातला रस संपलाय!
मी म्हणेन, हा रस्ता तुझ्यासाठी थांबलाय!
रस्त्याने जातांना चालायचा कंटाळा आला जरी,
कडेने सावलीची झाडं असतात, मग त्याच काय?
सखे...
तू म्हण, वेड्या तुला कळंत कसं नाही??
मी म्हणेन, तुला कळंत पण वळंत नाही!
पण अधाशी, जीवघेण्या वणव्यातही, अन
लपलपत्या ज्वाळांतही, काही गोष्टी जळंत नाही!
सखे...
तू म्हण, माझ्याकडून मी तुला खरंच विसरले!
मी म्हणेन, विश्वासाचे धागे असे कसे वीरले?
मुसळधार पावसात जीव जाळणांरे ऊन आले,
ऋतू असे कसे अचानक,न सांगता फिरले??
सखे...
तू म्हण, खरोखर तुझा काहींच उपाय नाही !
मी म्हणेन, हा आजार असा जाणार नाही
लढता लढता मेलो तरी बेहत्तर पण,
मरण्याच्या भयाने जगणं सोडणार नाही!
सखे....
तू म्हण,मी आता काहींच बोलणार नाही!
निर्धारानं...मी मह्णेन..मीही बोलणार नाही,
तुझ्यासहित तुझं आयुष्य खुप सुंदर आहे
त्याला असं खिळ लावून चालणार नाही!
सखे...
तू शेवटी...........................स्तब्ध राहशिल..
भिरभिरत्या नजरेने, इकडेतिकडे पाहशिल..
मी पाठमोरा होऊन, चालु लागल्यावर..
थरथरत्या ओंजळीत चेहरा धरुन...
स्वतःच्याचं आसवात,पुन्हा पुन्हा वाहशिल!!!
-निशिगंध (गणेश शिंदे,दुसरबिडकर®)