प्रिय चिऊ...

| |

प्रिय चिऊ....
तू residence address बदलला का?
नाही...तू हल्ली कुठेच दिसतं नाही..म्हणुन..
तुझी चिवचिव कानावर ऎकू येत नाही..म्हणुन
माझा दिड वर्षाचा मुलगा, खिडकीत बसुन
चिऊ ये..म्हणुन सतत तुझी आठवण करतो
अन तू येत नाही म्हणुन थोड्या नाराजीनंच
तुझा हक्काचा घास, काऊच्या पोटात भरतो
पूर्वी कसं...तु खुप वेळेस, कुठेही दिसायचीस
तुझ्या पिलांसहित, घरभर दंगा मांडायचीस
अंगणातले दाणे, चोचीनं टिपतं टिपतं मग
तुझ्या मैञिनींसोबत खोटं खोटं भांडायचीस
आता तेव्हढं मोठं अंगण नाही, हे अगदी खरं
पण भांडायला तू नाहीसं, हे ही तितकंच खरं
आताशा घरातला कोपरा सुना सुना असतो
मार्बलच्या टाइल्सवर काडीचाही कचरा नसतो
लहानपणी अंगणात आमची अंगतपंगत रंगायची
तूही यायचीसं अन हक्कानं आपला घास मागायची
आज जेवतांना दातांत खडा आल्याची जाणिव होते
अन मन मग तुझ्या आठवणींत कैक वर्ष मागे जाते
सकाळी तू उन्ह खात झाडावर बसलेली असायची
जणु ऎखादी शामळू मुलगी, चोपुन चापुन, घट्ट दोन
वेण्या बांधुन शेवटच्या बाकांवर बसलेली दिसायची
शाळेंत जातांना सहज वर नजर जायची, तारांवर अन
रांगेत तुम्ही बसलेल्या दिसल्या कि वाटांयच...
शाळा भरली बहुतेक..अन मग पावंलात बळ दाटायंच
खुपंच परिकथेसारखे,सोनेरी दिवस होते..नाही??
पण..पण आता मागंच खरंच काही ऊरलं नाही
तू तर नाहींच नाही........
मी अन तुझ्या आठवंणी सोडुन काहीचं नाही
तू नसल्यांन झाडेही फारशी चिवचिवतांना दिसत नाही
फक्त..जंगलातून गावात आलेल्या माकडांचा हैदोस
कावळ्यांची कावकाव,अन असलंच दिसतं काहीबाही
खरंच चिऊ....
तुझ्या हरवुन जाण्याची जाणिव अस्वस्थ करुन जाते
मनाच्या घरट्यांत मग वावटळं भरुन जाते
म्हणतांत....
mobile towerच्या rangeने तुला मिटवलंय
खरं खोटं माहीत नाही...
पण आजही मोबाईल फोन काढला की ...
त्यावरुन चिवचिवंत ओघळंणारे लालभडक थेंब..
जाणवतातं मला!!!
-निशिगंध (गणेश शिंदे, दुसरबिडकर)®