अर्ध्यावरचा डाव (कविता)

| |

तू मांडलेला पसारा
मी पांगवतोय घरभर सारा
तू येशिल..या आशेने
धूळभरल्या पंखानी वाट बघतोय वारा!
तू मांडलेला भातुकलीचा खेळ
वेळेआधीच बिघडला मेळ
तुझ्या अर्ध्या संसाराला
पुरला नाही क्षणिक वेळ!
तुझं येणं अन जाणं
माझं केविलवाणं जीणं
म्हणुन मी हि ठरवलयं य
आता तुझ्या मागोमाग येणं!!!

-निशिगंध (गणेश शिंदे,दुसरबिडकर)®

तुझी आठवण येते....

| |

तुझी आठवण येते...जेव्हा
सुर्य अस्ताला जातो
पक्षी घरट्याकडे वळतांत
बाजार संपल्यावर माणसं जशी
घराच्या ओढीनं पळतांत...
तुझी आठवण येते..जेव्हा
हसरी माणसं भेटतांत
लाजरी मुलं बोलतांत
निशिगंधाची फुलं जशी
ऎक ऎक करुन फुलतात
तुझी आठवण येते...जेव्हा
डोळ्यात अश्रु मावतं नाही
झाडे स्तब्ध, हलतं नाही
डोंगराआडचा सुर्य जेव्हा
वेळ होवुनही कलतं नाही..
तुझी आठवण येते...जेव्हा
कुणीतरी टचकन् बोलतं
अन् बापड मन जळतं
आपुलकीच्या सावलीसाठी
डोळे मिटुन सैरभैर पळतं
तुझी आठवण येते...जेव्हा
डोळ्यात अंधार दाटतो
काही दिसेनासं होतं
निळ्या आभाळात मन उडून
काही सुचेनासं होतं 
तुझी आठवण येते...जेव्हा
मोरपिस अलगद शरीरांवर फिरतं
तुझ्या सुगंधित श्वासासारखं...
रोम रोम रोमांचित करुन
अचानकचं पुन्हा हरवतं..
तुझ्या दूर जाण्याच्या भासासारखं
तुझी आठवण येते...जेव्हा
तुझ्याजवळून चोरून जपलेला
क्षण अन क्षण आठवतो 
अन त्याचवेळी अलगद मी
मनातलां पाऊस डोळ्यात साठवतो
म्हणुनचं...........  
तुझी आठवण आली की
मी स्तब्ध बसुन राहतो
भुतकाळाचे सांधलेले धागेदोरे
ऎक ऎक उसवून पाहतो.....
-निशिगंध (गणेश शिंदे® दुसरबिडकर)

येथे...

| |

येथे .... 
काहींच जगणं म्हणजे रोजंचच मरणं
काहींच बोलण म्हणजे मुक्यांच रडणं 
येथे....
काहींनाच मिळतात न मागता मुक्त श्वास.
काहींना मात्र उगाच श्वासांचे फक्त भास.
येथे....
रोजंच कुठेतरी भाकरी भाकरींच भांडण
रोजंच कुठेतरी  भाकरी भाकरीसाठी मरणं 
येथे.....
काहींसाठी चंन्द्र म्हणजे प्रेमसौन्दर्याचा साज
काहींसाठी चन्द्र म्हणजे उजेडाचा ऎक भाग.
येथे..... 
गुलाबी पहाट म्हणजे काहींसाठी साखरझोप
काहींसाठी माञ उगाच जीवाचा खटाटोप.
यॆथे..... 
काहींसाठी पोट म्हणजे ऎक मोकाट कुरणं
काहींसाठी माञ ऎक धगधगतं सरण.
येथे..... 
काहींच झूठ माञ तेव्हाच डामडौलानं सजतं 
काहींच सत्य केविलवाणं कोपर्यात लपतं...... 
-निशिगंध (गणेश शिंदे,दुसरबिडकर®)

वारा मी आणी ती...(कविता)

| |

वारा किती दिवाना
वारा किती शहाणा
तीच्या गालाहुन वाहण्याचा
त्याचा जाणुन मी बहाणा..
संयमित तीचा पदर
वार्याने हलता केला
तीचा गच्च अंबाडा
वार्याने फुलता केला
अन तो, पुटपुटला माझ्या कानी,
"आता सांग, कशी हि दिसते?"
मी अबोल अन तो उत्तरतो,
"जशी नाव ऎकली,वादळी सागरा असते"
पापण्या तीच्या चुंबूनी
वारा खट्याळ होतो
तीच्या फडफड पापण्या पाहुन
मी वार्याचा हेवा करतो
तीची मोरपिसाची काया 
थरथरते वार्याने थोडी 
उडतो पदर वार्यावर
अन तो "उगाचं" सावरते वेडी!
वारा निघुन जातो
स्थिरस्थावर सगळं होतं
अन उगाच मन माझं मग,
होत्याचं नव्हतं होतं!! 
-निशिगंध (गणेश शिंदे,दुसरबिडकर)