वारा मी आणी ती...(कविता)

| |

वारा किती दिवाना
वारा किती शहाणा
तीच्या गालाहुन वाहण्याचा
त्याचा जाणुन मी बहाणा..
संयमित तीचा पदर
वार्याने हलता केला
तीचा गच्च अंबाडा
वार्याने फुलता केला
अन तो, पुटपुटला माझ्या कानी,
"आता सांग, कशी हि दिसते?"
मी अबोल अन तो उत्तरतो,
"जशी नाव ऎकली,वादळी सागरा असते"
पापण्या तीच्या चुंबूनी
वारा खट्याळ होतो
तीच्या फडफड पापण्या पाहुन
मी वार्याचा हेवा करतो
तीची मोरपिसाची काया 
थरथरते वार्याने थोडी 
उडतो पदर वार्यावर
अन तो "उगाचं" सावरते वेडी!
वारा निघुन जातो
स्थिरस्थावर सगळं होतं
अन उगाच मन माझं मग,
होत्याचं नव्हतं होतं!! 
-निशिगंध (गणेश शिंदे,दुसरबिडकर)