हरवला आहे...(मुक्तछंद)

| |

गावं तसं खुप वाढलयं......
नवे रस्ते..नव्या ईमारती
नवेचं लोक...नवी वस्ती
म्हणतात...पलिकडच्या अंगाला
कोण राहतं..कळतही नाही
कुणाच्या सुखदुखाला कुणी
फारसं कधी पळतंही नाही
इतकं वाढलयं गावं.........
कारण.......
सगळ्याच सुविधा झाल्या ना राव....
वाटेल तसा पैसा फेकताच
अन् दत्तही न म्हणताच
सगळ्या गोष्टी हातात येवु लागल्या
अन् शेजारधर्म नावाच्या गोष्टी
हळुहळु पडद्याआड जावू लागल्या
अशातचं एक आरोळी उठली
गावाच्या पार त्या टोकाला,
त्या शंकराच्या मंदिराच्याही पुढे
जिकडे कुणी फारसं जातं नाही,तिकडे
''माणुस'' हरवलायं म्हणे......
तसं फारसं कुणाला वाईट वाटलं नाही म्हणा......
पण काही ''माणसांनी'' शोध घेण्याचा प्रयत्न केला...
अन् 'माणुसकी' जपावयाचा प्रयत्न केला
कुणी म्हणतं......
शंकराच्या जटेतल्या गंगेत तो सामावला
कुणी म्हणतं.......
शंकराच्या तीसर्या डोळ्यात तो राख झाला...
गावातं अराजकता माजलीयं...
माणुसकी सुळावर सजलीयं..
दुख लोकांना नाही..माणसांना आहे
दुर्जनात उरलेल्या,सज्जनांना आहे
उरलेलं एक-एक 'माणुस'ही असचं जाणारं
अन् उरलेल्यांच कत्तल ही असचं होणारं
गावं खरचं वाढलयं...वाढतयं
पण...... .पण.......
पण 'लोकांमधला' 'माणुस' कमी होतोय...
त्याचं काय?
हाच अधोरेखित प्रश्न कुणाला कधी
उमगेल काय??????????
-                      गणेश शिंदे, दुसरबिडकर
                                      9975767537