माया

| |

चाकोरीचे जीणे आता
माझ्या लागले पाठी
हिरवी स्वप्ने विरुन गेली
व्यवहार आला ओठी
ऎकसारखी रोज रोज ती
खरडावी ऎकचं वाट
थकुन जाते रात ऎकटी
विरुन जाते पहाट
नीळे अस्मान, चंन्द्रचांदणे
मी आता आठवत नाही
लयीत ऊडती संथ पाखरे
डोळ्यात साठवतं नाही
अथक लालसा अन स्वार्थाने
मी आता विणतो जगणे
ओठांनाही बोलुन गेलो
आता विसरा गाणे
पण.... कधीशा कातरवेळी
डोळ्यात दाटती छाया
मग असल्या जिण्यावर थुंकून
मी हळूच पुटपुटतो..........
"हि तर सगळी माया !!"
-निशिगंध (गणेश शिंदे,दुसरबिडकर ®)