कविता

| |

कविता...
अंतःकरणातुन उठलेली सल एक
भावनांच जीवघेणं अनामिक वादळ
मुक्या मनाचा हळुवार तलम शब्द
शांतता अस्वस्थ करणारी निस्तब्ध ..!! 

कविता...
स्वपनातील जाणं,परिस्थितीचं भान
गुलाबी यादो का शहर, अन ओसाड माळरान
कल्पनेने भारलेला अनंत रस्ता
अन मृत शवांची युद्धभुमि वैरान ...!! 

कविता.....
प्रेमाच स्पंदन अन प्रेमभंगाच आक्रंदन
कधी सरळ वाट,कधी नागमोडी वळणं 
कधी आशा अपेक्षांचा गच्च बाजार
कधी गिळुन टाकणारं निराशेचं महाद्वार ..!!  

कविता...... 
तरुण मनांच तडफडणं......फडफडणं
कधी फुलपाखरांगत आनंदी ऊडणं
म्हणुन, कविता कधी हाती घेऊ नये
अन हाती घेतली तर कधी सोडूच नये.... !! 

-निशिगंध (गणेश शिंदे, दुसरबिडकर)®©