अजुनही....

| |

आता तरी ऎकदा मला विसरु दे तुझं
जवळ नसतांना, माझ्याजवळं असणं
तू माझ्यापासुन दूर कुठेतरी असतांना,
तुझं अस्तित्व सदैव माझ्यात भासणं
अजुनसुद्धा तुझे दुरावलेले श्वास
माझ्या थांबणार्या श्वासात मिसळतात
आतातरी त्यांना निर्वाणीच सांग की,
पत्त्यांचे ईमले नेहमीच कोसळतांत
अजुनही माझ्या बरसणार्या डोळ्यात
अधिरतेचं ऎक अपेक्षित गाणं असतं
माझ्या डोळ्याना ऎकदा तरी सांगशील
मैफल संपल्यावर गाणं नसुन जाणं असतं
अजुनही कळंत कसं नाही मला की
हे वेडं मन तुझीच का वाट बघतं??
आता तरी मनाला सांग माझ्या शेवटंच
वेडं माणुस...वेड्याचंच आयुष्य जगतं
अजुनही माझा दिवस अन माझी राञ
तुझ्या आठवंणीशिवाय सरंत नाही
आता तरी ऎकदा म्हण ना सखे की
जळणं झाल की राखेशिवाय काही उरतं नाही 
बघ....तु म्हणते तसं माझ्यासारखा वेडा मीच.... े
तुला खरोखर कायमचं विसरायचयं म्हणतोय
अन अजुनही राञ राञ जागून मी
तुझ्यासाठीची तुझी कविता रचतोय.
जावु दे..सरतेशेवटी ऎक सांगु मनातंल??
तुझ्यामुळं खरंच माझं आयुष्य सुंदर झालं...
तुझं परत येणं अपेक्षित नव्हतंच कधी 
पण तरीही  वाट बघण्याच निमित्त झालं... 
-निशिगंध (गणेश शिंदे, दुसरबिडकर)®े