राञप्रेम

| |

जाग कलंडते, ह्या कुशीहुन त्या कुशीवर
पण माझी राञ काही  केल्या सरतं नाही 
स्वपने तर माझ्यापासुन  मैलोनमैल दुर
उघड्या डोळ्यात थोडीही झोप भरतं नाही
तस म्हटलं तर,माझं हे असं रोजचंच आहे
दिवसा अगदी शहाण्यासारखं वागायचं
अन राञी माञ वेड्यासारखं जागायचं
राञीची जागेपणीची अनाहुत स्वप्न म्हणजे
खरंच खुपचं असतो बिनकामाचा फापटपसारा
कळतं नकळत ऎक ऎक गोष्ट छळतं जाते
अन जळता जळता,ऊजेडातही अंधार होतो सारा
राञ कधीच राञीची राहत नाही, जेव्हा मी जागतो
ते नेहमी सवाल करते, का रे..तु असा कसा वागतो?
तीच्या निरागस प्रश्नावर तसं मी निरुत्तर असतो
पण तिला या सगळ्यात तिचा तपोभंग झालेला दिसतो
काही क्षणी राञ माझी प्रेयसी होते, काही क्षणी दासी
तर काही क्षणी गळ्याभोवती मिठी मारणारी फासी
काही क्षणी माझी जगण्याची दिशा होते,द्रदशा होते
अन काही क्षणी पाठ फिरवुन माझ्यातील उत्कट निराशा सुद्धा होते...
तरीही राञ माझी असते अन मी राञीचा असतो...
कारण माझ्या मनाचा खरा आरसा फक्त राञीलाच दिसतो........!! 
-निशिगंध (गणेश शिंदे, दुसरबिडकर)®