याद आहे..(गझल)

| |

यार नाही,प्यार नाही,फक्त झुरणे याद आहे..
तेच भागाकार आणिक शून्य उरणे याद आहे..!
कैकवेळा गायलो अन कैकवेळा ऎकले पण..
खास गाणी मैफलीची तीच स्फुरणे याद आहे..!
जिंदगीच्या फोडणीला भावनांचा जाळ आणिक..
वेदनेच्या लोणच्याचे मस्त मुरणे याद आहे..!
जीवघेण्या होत आहे रोजच्या त्या वंचना अन,
वल्गनेच्या ह्या शवाला फक्त पुरणे याद आहे..!

कोण जाणे आज आहे ते उद्या असणार नाही..
त्याचसाठी ह्या क्षणांना रोज चुरणे याद आहे..!
                                        - गणेश शिंदे,दुसरबिडकर
                                                        9975767537