आठवणीतला रेडिओ (ललित)

| |


''नमस्कार श्रोतेहो..हे आकाशवाणीचे औरंगाबाद-
परभणी केन्द्र आहे.सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे
आणि बारा सेकंद झालेले
आहे.आता ऎकुया मराठी भक्तीसंगित..''
माझ्या लहानपणीच्या अविस्मरणीय क्षणातील हा ऎक
क्षण..रेडिओने मला इतक्या काही सोनेरी गोष्टी बहाल
केल्याहेत की हे आजच आयुष्य त्याने कळत-नकळत
माझ्यावर केलेल्या संस्काराच फलित म्हटल्यास
अतिश्योक्ती नसावी..!!
रेडिओ माझ्या जन्माआधीच वडिलांच तिसरं अपत्य म्हणून
त्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता..खरं तर
तो ट्रान्झिस्टर होता.फिलिप्स कंपनीचा नामांकीत सहा सेल
असणारा मर्फी रेडिओ.भला मोठा,त्याला चामड्याच,बेल्ट
असलेल कव्हर,स्पिकरच्या ठिकाणी जाळीदार नक्षी.चार
बँन्ड असलेला..अर्थात माझ लहाणपणीच हेच खेळणं
आणि साथिदार होता.
त्यावेळी प्रामुख्याने जळगाव,पुणे,औरंगाबाद-परभणी(तेव्हा ते
एकत्रित होतं),रेडिओ सिलोन,आल इंडिया रेडिऒ,जबलपुर,इं
दौर,विविध भारती ही आकाशवाणी केन्द्रे वडील प्रामुख्याने
ऎकायचे व नंतर मलाही तोच छंद जडला. सकाळी सहाला सुरु
झालेला रेडिओ अकरापर्यन्त सुरु असायचा.नंतर प्रक्षेपण
बंद व्हायच.जेव्हा टुण्ण्ण असा आवाज सुरु नी रेडिओ बंद..
साडेबराला पुन्हा ऎकदा याच ट्युनर फिरायच..
सकाळच्या काही कार्यक्रमात एक नाटिका असायची.नवरा-
बायको व नवर्याचा मित्र
मधुभाऊजी.दहा मिनिटाची मिश्किल नाटिका अन शेवटी सुंदर
संदेश..संस्काराच्या बाळकडुची जणू सुरुवातच
होती ती माझ्यावरच्या..!! निवेदकांचे/निवेदिकांचे आवाज तर
इतके नसानसात भिनलेय की आजही ''अब आप देवकीनंदन
पांडे से समाचार सुनिये'', ''बहनो और भाईयो..'' वाला अमिन
सयानी, विविध भारतीच्या दुपारच्या 'सखी सहेली'
कार्यक्रमातली कमल शर्मा यांच नाव दिसल की त्यांचे
आवाज कानावर तरळून जातात. आज रेडिओ कालबाह्य
झाला.माझ्याही घरात नाही,पण रेडिओच्या ह्या आवाजांनी जे
गारूड मनावर चढलय ना..बस्स...मरते दम तक उतरेगा नही..!!
दुपारी साडेबाराला 'आपली आवड'
असायचा.त्या निवेदिकेची स्पेसिफिक स्टाईल
असायची की,''आता ऎकुया ***चित्रपटातल
गित,ज्याला संगितबद्ध केलय **** ह्यांनी आणि स्वर
आहेत ****ह्यांचे..आणि ह्या गिताला आवड कळवणारे
श्रोते आहे जयभवानी श्रोता संघ** ** गाववरून,शामराव,
विठ्ठल,अमुकअमुक तमुक तमुक..''पण हेही ऎकायला इतक
छान वाटायच की नुसत्या ह्या परिचयावरून मी परफेक्ट गित
ओळखायचो.काही श्रोत्यांची नावे मी सगळ्या स्टेशनवर
ऎकायचो..अगदी दुरवरच्या भरतपुर स्टेशनवरही..फार कौतुक
वाटायच त्यांच्या रसिकतेच.जी जुन्यातली जुनी गाणी,रामदास
कामत,बालगंधर्व,पं.अभिषेकी इत्यादींची नाट्यगिते,लोकसं
गितातील शाहिर साबळे,शाहिर उमप
ह्यांची खड्या आवाजातली 'टिमक्याची चोळी बाई','फु बाई
फु' सारखी गिते,सुगम संगित,भावगिते
माझ्या ओठावर,र्हद्यात स्थान मिळवून बसली आहेत,याच
सारं श्रेय त्या रेडिओलाच...!!सक
ाळचा मुलांसाठी असणारा 'किलबिल',संध्याकाळी पाचला सुरु
होणारा 'युववाणी','लोकजागर' त्यानंतर
लागणारा लोकसंगिताचा शाहिर
***आणि सहकार्यांच्या आवाजातला कार्यक्रम..कितिक
नावे घ्यावी?कितिक आठवावे??त्यावेळ
ी मनोरंजनाची दुसरी साधने नव्हती त्यामुळे
या रेडिओशी इतक जवळच नातं निर्माण झाल होत..!!पण
आजच्या वाहिन्यांच जाळं,त्यावरचे
कार्यक्रम ,जाहिराती बघितल्या की वाटतं
हा 'सखा',किती तरी सुसंस्कारीत नी चांगला होता..!!
विविध भारतीने तर इतक्या काही सुंदर
गोष्टी श्रोत्यांना समर्पित केल्या की,अस वाटत
की 'खरा रसिकांचा जन्म विविध भारती साठीच' अस
क्षणभर वाटून जातं..!विविध भारतीवरील भुले बिसरे
गित,जयमाला,हवाम
हल,सखी सहेली,फौजी भाईयो की पसंद,पिटारा,उजाले
उनकी यादो के..काय काय नी कितिक नावे घ्यावी??कितीतरी
आनंदाच्या गोष्टी नकळत मन जमा करीत होते. सकाळी सुरु
झालेला रेडिओ विविधभारतीच्या रात्रीच्या 'जयहिंद'ने बंद
व्हायचा..!!
दुपारच्या वेळी आवडीची गाणी सुरु झाली की मी आवाज
वाढवून द्यायचो,बाहेर लिंबाच्या सावलीत खाटेवर पडून
रेडिओ कुशीत घेवून स्वर्गसुख घेण्याचा आनंद कदाचित
आजच्या पिढिला घेता येणार नाही.
आजही मला आठवते,दिवाळीच्य
ा नरकचतुर्दशीला सकाळी नरकासुराच्या वधाच किर्तन
सकाळी साडेचारला असायच..त्यावेळी आई
इतक्या सकाळी अंघोळ घालून ते किर्तन
ऎकायला लावायची.हा कैक वर्ष माझ्या घरातला प्रघात
होता दर दिवाळीचा..!! दिवसभर खरखर
असणार्या रेडिओचा जशा चांदण्या उगवायला सुरुवात
व्हायची तसतसा आवाज सुस्पष्ट होत जायचा.वडिलांच्य
ा बाजेखालचा रेडिओ सुंदर गाणी गात रहायचा व
मला कधी झोप यायची कळायचही नाही..कधीकधी तर
रात्रभर तो सुरुच असायचा.बाबा त्यावेळी किराणामालात
ऎकवेळ गोडेतेल विसरायचे पण रेडिओचे सेल कधी विसरले
नाहीत.रेडिओने लावलेली गितांची गोडी आजही कायम
आहे,खंत फक्त हिच की वाढलेली गोडी,बघायला रेडिओ
जवळ नाही.. !!
आज मोबाईल,पिसी,लॅपटॅापमध्ये
हजारो नवी जुनी गाणी आहेत,ऎकायला सुश्राव्य हेडफोन्स
आहेत,कुठेही खरखर नाही,व्यत्यय नाही पण
जी गोडी रेडिओच्या आवाजात
होती,ज्या गाण्यासाठी आतुरतेने वाट
बघितली जायची ती ओढ नाहिये.हा खर्या अर्थान खुप
काही दौलत बहाल करुन,बाजुला झालेला,विस्मरणात
गेलेला फार जवळचा मित्र आहे.किती जनांना याची आठवण
येत असेल,किती जनांना काहितरी मागे सुटल्याची जाणिव होत
असेल माहित नाही..पण
आजही ऎकटा असलो की ह्याच्या आठवणी मनात
दाटतात..एका हळव्या कप्प्याच झाकण परत उघडल्या जातं
अन ह्याच्या युगात मी परत ओढल्या जातो..नकळत...मन
ातल्या मनात..!!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537